MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD
आणि
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ
स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र. इमाव १०९६/प्र . क्र . ३९५ / विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय ( वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय या सारखे ) व्यापार किंवा उद्योग याची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.
इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधन सामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्या कडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचे कडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करून घेणे, आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.
ओ.बी.सी. महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारा स्वयंरोजगाराची कवाडे ओ.बी.सी. जनतेच्या निरंतर सेवेसाठी......
प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१ दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685 homsobcfdc[at]gmail[dot]com